चव्हाणवाडी (श्री मनोहर धुरी) राजापूर तालुक्यातील युवा नवरात्रोत्सव मंडळ वरची वाकी या ठिकाणी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी भजनाचा 20 20 तिरंगी सामना रंगणार आहे हा सामना विनोद आणि मनोरंजन याची ख्याती असणारे बुवा श्री संदीप पुजारे देवगड विरुद्ध अध्यत्माचे बादशहा बुवा श्री गुंडू सावंत कुडाळ विरुद्ध बतावणी व पहाडी आवाजाचे सम्राट बुवा श्री प्रकाश पारकर कासारडे यांच्यात ही जुगलबंदी रंगणार आहे हे तिन्ही बुवा भजनाचे जाणकार आहेत या बुवांनी एकमेकांच्या विरोधात शेकडो डबल बारी सामने रंगवले आहेत हे तिन्ही बुवा भजनाचा वारसा गेली अनेक वर्षे जपत आहेत आज भजन क्षेत्रात हे तिन्ही बुवा महाराष्ट्र भर पोहचले आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान व मानाचा तुरा आहेत
हे बुवा भजनातील जाणकार असून शेरास सव्वाशेर बतावणी करण्यात माहीर आहेत
यावेळी सुद्धा एकमेकांना ठसका देऊन रसिक वर्गाचे मनोरंजन होणार आहे मात्र भजन रुपी नामस्मरण जनमानसात कसे रजेल याकडेही या बुवांचा लक्ष असतो या तिरंगी सामन्यात सप्तसुरांची मैफिल रंगणार असून विनोदी शेलकी बतावणी पखवाज तबला वरील बोटांचा नाद पेटीच्या सुरांचा त्रिवेणी संगम असा हा दुग्ध शर्करा मेळा भजन रसिकांना अनुभवायला मिळणार आहे तरी या भजनाच्या 20 20 तिरंगी सामन्याचा परिसरातील भजन रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा नवरात्र उत्सव मंडळ वरची वाकी यांनी केले आहे
वाकी येथे दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी भजनातील तीन जाणकार बुवांचा होणार 20 – 20 तिरंगी सामना- भजनाचा त्रिवेणी संगम आणि दुग्ध शर्करा योग
