सामाजिकवाजत- गाजत घरोघरी गौराईचे आगमन; आज साजरा होणार तिखटा सण

वाजत- गाजत घरोघरी गौराईचे आगमन; आज साजरा होणार तिखटा सण

रत्नागिरी:-  मोठय़ा भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाच्या आगमनानंतर तीन दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे आगमन प्रथेप्रमाणे आणि तितक्याच पारंपारिक, भक्तीमय वातावरणात झाले आहे. या लाडक्या गौराईचे मोठय़ा थाटात महिला, कुमारीकांनी त्या त्या ठिकाणच्या पाणवठय़ावरून आगमन केले.

महिलांनी आपल्या लाडक्या गौराईला साजश्रुंगार करून तिला नटवून गणरायाच्या शेजारी प्रतिष्ठापना केली आहे. आगमनानंतर गौराईचा अगदी लाडाने पाहुणचार केला जातो. आता दोन दिवस तिच्या स्वागताचा जागर रंगणार आहे. कोकणात गणेशोत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा होत होतो. जिल्हय़ात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. या गणोशोत्सवात गौरी पुजनालाही तितकेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी…वर्षातून दोन दिवस गौरी माहेरी राहण्यासाठी येते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱया दिवशी गौरी येतात. गणरायापाठोपाठच तीन दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे महिलांनी अगदी मोठय़ा थाटात आणि उत्साहात आगमन करण्यात आलेले आहे. घरोघरी तिचे विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आता दोन दिवस साऱया महिला गौराईचा पाहुणचाराचा जागर तितक्याच लाडाने करण्यात दंग राहणार आहेत.

विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे. गौरी पूजन सोहळा प्रत्येक भागानुसार वेगवेगळी परंपरा आहे. वेगळी परंपरा प्रत्येक प्रांत आणि भागाप्रमाणे गौरी उत्सवाची पद्धत बदलते. कोकण असो वा इतर प्रांत असो, या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पहायाला मिळते. पण, महिलांच्या या सणात भक्तीभाव एकच असतो. माहेरवाशीण असलेल्या गौराईचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी नवविवाहीता माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची, तर खडय़ांच्या गौरींची पद्धत आहे.

गौरी आवाहन करुन गावोगावी गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी विहीरीवरुन, नदीवरुन सात खडय़ांच्या रुपात गौरी आणली जाते. तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे सुंदर साडी, चोळीने सजवुन त्यांची पुजा व आराधना केली जाते. बऱयाच भागात लाकडी गौरी किंवा त्यांचे मुखवटेही असतात. अशा या लाडक्या गौराईचे मोठय़ा थाटात महिला, कुमारीकांनी त्या त्या ठिकाणच्या पाणवठय़ावरून आगमन केले. घरी आल्यानंतर महिलांनी आपल्या लाडक्या गौरीचा साजश्रुंगार करून तिला नटवण्यात आले. आता दोन दिवस महिलांकडून गौराईची आराधना, आरती, विविध गीते, गाणी असा तिच्या पाहुणचाराचा जागर रंगणार आहे. आज बुधवारी गौरी पुजनात गौरीला गोडाचा तसेच काही ठिकाणी तिखट (सामिष) नैवेद्य केला जाणार आहे. पाच दिवसांच्या गणपतीसोबतच गावारी विसर्जनादिवशीच गौरीचे विसर्जन केले जाणार आहे.

Breaking News