राष्ट्रीय विज्ञान दिन व चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शेखरजी निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सह्याद्रि आय.टी.आय. सावर्डे मध्ये तांत्रिक मॉडेल प्रदर्शन 2026 चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ.पूजाताई शेखर निकम,नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय राजाराम कदम,नवनिर्वाचित चिपळूण पंचायत समिती सदस्य श्री.शौकत हुसेन माखजनकर,सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडीक,सह्याद्रि आय.टी.आयसावर्डेचे व्यवस्थापन कमिटी सदस्य श्री.अब्दुल रज्जाक इसाक शेख, राधा गोविंद फाउंडेशन सावर्डेचे कार्याध्यक्ष श्री.अनिरुद्ध शेखर निकम, बी एससी.आयटी कॉलेज सावर्डेचे प्राचार्य श्री.एकनाथ गावडे, आय.टी.आय. सावर्डेचे प्राचार्य श्री. उमेश शशिकांत लकेश्री आय.टी.आय सावर्डेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीं उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत सोडून करण्यात आले.
सर्व मांडणी केलेल्या तांत्रिक मॉडेलची सर्व मान्यवरांनी पाहणी केली ,व मॉडेल तयार करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना मॉडेलची माहिती विचारली त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागत व सन्मान आय.टी.आय प्राचार्य श्री.उमेश लकेश्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला.जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2026 मध्ये आय.टी.आय सावर्डेच्या मेकॅनिक मोटार व्हेईकल प्रोजेक्टला 8 वा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी कु.सोहम कुंभार व कु.आयुष निवळकर तसेच निर्देशक श्री.प्रशांत भिसे व श्री. प्रथमेश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच आर.ए.सी निदेशक श्री.सुरेंद्र हातखंबकर यांचा शिवबा प्रतिष्ठान राजापूर यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आय.टी.आय संदर्भातील व्यवसाय कोर्सच्या . रिल्स प्रोजेक्टवर दाखवण्यात आल्या.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ.पूजाताई शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात विज्ञानातून कौशल्य आत्मसात करा.त्याचबरोबर आय.टी.आयच्या विविध कोर्सेसमधून शिकविले जाणारे विविध कौशल्य आत्मसात करा. व पुढे जावून आप आपल्या गावचे चांगले नागरिक बना व आपली उन्नती करा.जेणेकरून तुमचे व आपल्या सह्याद्रि शिक्षण संस्थेचे नाव उंचावेल असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिटर निर्देशक श्री.सुभाष गोरिवले व आभार प्राचार्य उमेश लकेश्री यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
