*प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागर
परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात असताना या दिंडी सोहळ्यात लोरे येथे वारकरी राजू रावराणे यांच्या निवासस्थानी पायी दिंडी थांबली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिंडीत सहभागी होत विठ्ठल नामात एकरूप झाले.वारकऱ्यांच्या भक्तिभावाचा आणि उत्साहाचा अनुभव घेऊन विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालो.यावेळी विना पूजन आणि आरती मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज,ह.भ.प.दीपक मडवी महाराज, गायकवाड महाराज, आपटे महाराज, अंधारी महाराज, देसाई महाराज यांच्या समवेत माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे,भाजप पदाधिकारी राजू रावराणे, सिद्धेश रावराणे, रितेश मेस्त्री व अन्य मंडळी उपस्थित होते.
