रत्नागिरीविद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान पालकांशी संवाद साधत शैक्षणिक सहकार्याची केली चौकशी

विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान पालकांशी संवाद साधत शैक्षणिक सहकार्याची केली चौकशी

विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान पालकांशी संवाद साधत शैक्षणिक सहकार्याची केली चौकशी

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या ४६ विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तसेच नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे व सामाजिक कार्यकर्ते भाजपा शहराध्यक्ष परशुराम ढेकणे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.

या उपक्रमामागील उद्देश केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान करणे एवढाच नव्हता, तर त्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी काही अडचणी गरजा किंवा प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मदतीची आवश्यकता आहे का याची माहिती घेणे हाही होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच त्यांच्या भविष्यातील ध्येयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सौ. वर्षा परशुराम ढेकणे व परशुराम (दादा ) ढेकणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कोणत्याही शैक्षणिक मार्गदर्शनाची अथवा मदतीची आवश्यकता भासल्यास सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या उपक्रमामुळे प्रभागातील पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्याबरोबरच त्यांच्या भविष्यासाठी लोकप्रतिनिधी संवेदनशीलपणे पुढाकार घेत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे संपूर्ण प्रभागात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...