रत्नागिरीशासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीत डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी 'ऑन-द-स्पॉट' फेरी; ३ व ११ सप्टेंबरला संधी

शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीत डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी ‘ऑन-द-स्पॉट’ फेरी; ३ व ११ सप्टेंबरला संधी

शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीत डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी ‘ऑन-द-स्पॉट’ फेरी; ३ व ११ सप्टेंबरला संधी
रत्नागिरी, (जिमाका) – शासकीय तंत्रनिकेतन (Government Polytechnic), रत्नागिरी येथे डिप्लोमा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ३ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर रोजी ‘ऑन-द-स्पॉट’ (On-the-Spot) प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. उपलब्ध रिक्त जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे यांनी केले आहे.
प्रवेश फेरीचे वेळापत्रक (प्रथम व थेट द्वितीय वर्ष):

  • उमेदवार नोंदणी: सकाळी १०:०० वाजेपर्यंत
  • तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List): सकाळी १०:४५ वाजता
  • तक्रारी/हरकती स्वीकारणे: सकाळी १०:४५ ते ११:००
  • अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List): सकाळी ११:१५ वाजता
  • प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया: सकाळी ११:३० पासून
    महत्त्वाच्या सूचना व अटी:
  • उमेदवारांकडे FC (CAP / NON-CAP) मान्यता पावती, सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राचा झेरॉक्स संच असणे अनिवार्य आहे.
  • मूळ कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रवेश शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल.
  • फेरीत उपस्थित राहिल्याने प्रवेशाची हमी मिळणार नाही; प्रवेश उपलब्ध जागा व गुणवत्तेनुसारच दिला जाईल.
  • प्रवेश रद्द करून संपूर्ण शुल्क परतावा मिळण्याची अंतिम मुदत १२ सप्टेंबर २०२६ आहे.
    अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.gpratnagiri.org) भेट द्यावी.

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...