कै. सुहास प्रल्हाद सोहोनी. वय – ८० वर्षे, राहणार – रुपाजी सोसायटी, सुभाष रोड, रत्नागिरी यांचे
दिनांक – ०३/०२/२०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. जानेवारी २०२५ रोजी सुहास सोहोनी व त्यांची पत्नी शोभा सोहोनी यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी देहाचा उपयोग व्हावा या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदान इच्छापत्र फॉर्म भरला होता. त्यांच्या स्वतःच्या व कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक ०३/०२/२०२६ रोजी करण्यात आले.
कै.सुहास सोहोनी यांच्या पश्चात पत्नी शोभा सोहोनी, मुलगा राहुल सोहोनी तसेच नातवंडे असा परिवार आहे.
सदर मरणोत्तर देहदानाच्या वेळी कै. सुहास सोहोनी यांचा मुलगा राहुल सुहास सोहोनी नातेवाईक आणि मित्रपरिवार
आनंद जोशी, राजु जोशी, प्रकाश सोहोनी,दत्तात्रय सोहोनी, प्रवीण लिमये, आयुष लिमये, दिनेश सोहोनी, सुभाष गानू, प्रदीप आगाशे, विनायक शितूत,, समीर जोशी, स्वप्नील गानू, सुहास विद्वास उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ.सादिकअली सय्यद,
डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक श्री.रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर,भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी व प्रियल आडिवरेकर यांनी काम पाहिले.
