शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे 206 वे मरणोत्तर देहदान…
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या प्रेरणेतून शिष्यपरिवारातील कै.श्रीम.मंजुळा वसंत तोडणकर. वय – ९१ वर्षे, राहणार – तळवाडी,नाणीज, रत्नागिरी यांचे दिनांक – २०/०५/२०२६ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक २१/०५/२०२६ रोजी करण्यात आले. सदर देहदान हे 206 वे देहदान होते.
कै.श्रीम.मंजुळा तोडणकर यांच्या पश्चात मुलगा वसंत तोडणकर, सून असा परिवार आहे.
सदर मरणोत्तर देहदान वेळी श्रीम. तोडणकर यांचा मुलगा श्री. वसंत तोडणकर, सून व नातेवाईक उपस्थित होते.
देहदानप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर, मुन्ना साळवी,अनिता जाधव, पत्रकार राजन बोडेकर आदी उपस्थित होते. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज संस्थान, नाणीज यांच्या माध्यमातून ०५ वे देहदान करण्यात आले. सदर देहदानकामी सागर भिंगारे, माणिक पाटील, विनायक शिवगण ( सरपंच नाणीज ग्रामपंचायत) यांचे सहकार्य मिळाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागातील डॉ. योगिता कांबळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर,भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी व रुग्णवाहिका चालक पवन झोरे यांचे सहकार्य लाभले.
