रत्नागिरीशिर्डी औद्योगिक क्षेत्रातील 'ग्लोब फोर्ज लिमिटेड' - निबे ग्रुपच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल...

शिर्डी औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोब फोर्ज लिमिटेड’ – निबे ग्रुपच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्‌घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते, तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि सीडीएस अनिल चौहान तसेच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न झाले

शिर्डी औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोब फोर्ज लिमिटेड’ – निबे ग्रुपच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्‌घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते, तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि सीडीएस अनिल चौहान तसेच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न झाले.

यावेळी बोलतांना ना. उदय सामंत ह्यांनी हा प्रकल्प देशातील पहिला आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आर्टिलरी बॉम्ब शेल निर्मिती प्रकल्प असून याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत यामुळे देशाच्या संरक्षण उत्पादनाला मोठी गती मिळेल आणि आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल. या भव्य प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून महाराष्ट्र हे देशातील प्रमुख ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून अधिक वेगाने उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी निबे लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. गणेश निबे, निबे ग्रुपचे वरिष्ठ पदाधिकारी, उद्योजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षक नियुक्तीसाठी 29 मे पर्यंत मुदतवाढ

खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षक नियुक्तीसाठी 29 मे पर्यंत मुदतवाढरत्नागिरी,...