राजापूरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटातील पाचल जिल्हा परिषद गटात गळती सुरूच

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटातील पाचल जिल्हा परिषद गटात गळती सुरूच


रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील हरळ येथील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शाखा प्रमुख प्रभाकर सिताराम शिंदे आणि त्यांचे सुपुत्र प्रतीक ट्रॅव्हलचे मालक प्रतीक शिंदे ह्यांनी शिवसेना पक्षावर व राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या प्रमूख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याप्रसंगी विधानसभा संघटक प्रकाश कुवळेकर, विभागप्रमुख अमर जाधव, जितू तुळसवडेकर, तालुका युवाधिकारी सुनील गुरव, नगरसेवक सौरभ खडपे, युवा सेनेचे प्रसाद गुरव, रवींद्र सावंत, सोनू पाथरे, अमेय कोलते, बाबू पडवळ व सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.*

Breaking News