राजकीयशिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ,सिंधुदुर्ग येथे आयोजित...

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ,सिंधुदुर्ग येथे आयोजित शिवसेना आभार मेळाव्यास शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. आमदार निलेश राणे यांच्या मतदारसंघात हा अतिशय भव्य मेळावा आयोजित केला होता.

शिवसेना पक्षाचे आमदार म्हणून कायमच सामाजिक कामं प्रथम व राजकारण नंतर याप्रमाणे आमदार निलेश राणे हे अतिशय चांगलं काम कुडाळ-मालवण मतदारसंघात करत आहेत. त्यांच्या कार्याच मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर कौतुक यावेळी केलं. त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या मतदारसंघात 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केली. आमदार निलेश राणे यांचं नेतृत्व फक्त मतदारसंघात मर्यादित नसून महाराष्ट्रात त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग असल्याचे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले व भविष्यात येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईमध्ये निलेश राणे हे पक्षाला मजबूत करतील असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिवसेनेची सभासद नोंदणी ही आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल असाही विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार श्री.किरण भैया सामंत, माजी आमदार श्री. राजन साळवी, माजी आमदार श्री.रवींद्र फाटक, उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री संजू परब, प्रवक्त्या सौ. ज्योतीताई वाघमारे, श्री. बाळा चिंदरकर, श्री संजय पडते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित होते.

Breaking News