रत्नागिरी, .:- हवामान बदल, बाजारातील चढ उतार आणि शेतीविषयक अचूक माहितीसाठी असणाऱ्या मर्यादांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती मिळावी, यासाठी कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ अॕप विकसित केले आहे. गुगल प्ले स्टोअर जाऊन आजच महाविस्तार ए आय ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. ॲपची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळीच व विश्वासार्ह कृषी माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने राज्यभर ‘महाविस्तार एआय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॕप सुरू केले आहे. महाविस्तार एआय अॕप हे शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करणारे एक प्रभावी डिजिटल व्यासपीठ आहे. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॕप शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचा सल्ला तसेच आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन एका क्लिकवर उपलब्ध करून देते. एआय चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळतात. या अॕपबाबत कृषी विभागाने जिल्हाभर जनजागृती केली आहे.
या अॕपच्या माध्यमातून हवामान अंदाज, पीक लागवडीच्या पद्धती, कीड व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था तसेच डीबीटीवरील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. बाजारभावाची अद्ययावत माहिती, विविध कृषी योजना, अनुदान व पीकविमा योजनांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाविस्तार अॕपवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यात महाविस्तार एआय अॕपवर 40 हजार 167 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. रत्नागिरी 6 हजार 790, राजापूर 3 हजार 907, लांजा 4 हजार 886, चिपळुण 6 हजार 150, संगमेश्वर 3 हजार 936, गुहागर 2 हजार 11, खेड 4 हजार 396, दापोली 4 हजार 501, मंडणगड 3 हजार 590
शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ अॕप डाऊनलोड करुन नोंदणी करावी- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले
