रत्नागिरीश्रीमती , मुन्नव्वरा फिरोज खान तांबोली ,मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे मुख्याध्यापिका पदी...

श्रीमती , मुन्नव्वरा फिरोज खान तांबोली ,मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे मुख्याध्यापिका पदी रुजू

रत्नागिरी शहरातील नामवंत संस्था तालीमी इमदादिया कमिटी रत्नागिरी – मुंबई द्वारा संचलित मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत असलेले श्री महमदझुबेर आदम गडकरी आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून मागील 3 वर्ष मिस्त्री हायस्कूल येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत असताना आपल्या सेवेतून दि . 30 जून 2025 रोजी सेवानिवृत्त झाले . त्यांच्या रिक्त पदी दि . 1 जुलै 2025 पासून श्रीमती . मुन्नव्वरा फिरोज खान तांबोली यांची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झाली . तालीमी इम्दादिया संस्थेच्या वतीने नवनियुक्त मुख्याध्यापिका श्रीमती . मुन्नव्वरा फिरोज खान तांबोली यांचे स्वागत व अभिनंदन संस्थेचे सहसचिव श्री शकील मजगांवकर, संस्थेचे खजिनदार श्री . जाहीर मिस्त्री यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले .
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री . अलिमियाॅ काझी ,माध्यमिक शिक्षक शाळा सेवक पतपेढी व जिल्हाध्यक्ष श्री . सागर पाटील सर ,माध्यमिक शिक्षक अध्यापक संघाचे ज्येष्ठ नेते व सल्लागार श्री . आत्माराम मेस्त्री ,माजी मुख्याध्यापक व टी. डी . एफ नेते श्री . सी . एस . पाटील सर ,जिल्हा संघटक टी . डी . एफ श्री . सचिन मिरगल सर ,स . रा. देसाई हायस्कूलच्या सहा शिक्षिका पिलनकर मॅडम, पाली हायस्कूल चे सहा शिक्षक श्री. फिरोज खान तांबोली सर, माजी नगरसेवक श्री . सुहेल मुकादम, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. सिराज खान सर,व श्री . इक्बाल हुनेरकर सरमाजी क्लर्क श्री. अ . मजीद काजी ,पंचायत समितीच्या विषय तज्ञ श्रीमती खालिदा जमादार, युनिक संपर्क फाउंडेशन चे श्री. शकील गवाणकर, मिस्त्री प्रायमरिच्या मुख्याध्यापिका व शिक्षक तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. मुशताग आगा व शिक्षक वर्ग तसेच मालवणकर, नाकाडे व ठाकूर कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून वैयक्तिकरित्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार व अभिनंदन केले.
  उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे सहसचिव श्री. शकिल मजगांवकर, श्री. अलिमिया काझी, श्री. सागर पाटील, श्री. प्रशांत सनगरे व माजी मुख्याध्यापक सिराज खान सर या सर्वांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त श्री. महमदझुबेर गडकरी सर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत नवनियुक्त मुख्याध्यापिका सौ. मुन्नव्वरा फिरोज खान तांबोली यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां दिल्या व अभिनंदन केले.

तसेच नवनियुक्त मुख्याध्यापिका यांनी आपल्या मनोगतात मुख्याध्यापक पद स्वीकारल्याबद्दल सर्व उपस्थितांचे व संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले . या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेतील शिक्षक श्री. इम्तियाज सिद्दिकी यांनी केले . शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ,विद्यार्थी वर्ग ,पालक वर्ग तसेच समाजातील सर्व थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Breaking News