स्थळ: संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर
ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने आयोजित पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.
या प्रसंगी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पहिला “कांताबाई सातारकर लोककला पुरस्कार”ज्येष्ठ तमाशा कलावंत व वगनाट्य लेखक मा. कोंडीराम आवळे मास्तर यांना प्रदान करण्यात आला.
लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या कलावंतांचा सन्मान म्हणजे आपल्या परंपरेचा सन्मान होय.
आजच्या या सोहळ्यात लोककलेच्या माध्यमातून समाजजागृती घडविणाऱ्या कलाकारांविषयी आदर व्यक्त करताना मन आनंदाने भरून आलं. स्व. कांताबाई सातारकर, विठ्ठल उमप, बाबुराव सातारकर अशा थोर लोककलावंतांच्या कार्यातून महाराष्ट्राची संस्कृती आजही जिवंत आहे, हे अधोरेखित करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आमदार अमोल खताळ पाटील यांचं मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक.
त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये लोककलेला नवसंजीवनी मिळत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
या निमित्तानं मी संगमनेरमध्ये MIDC स्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला असून, येत्या आठवड्यात यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात येतील.
या MIDCच्या माध्यमातून संगमनेरमधील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.
यावेळी आमदार अमोल खताळ पाटील, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष डॉ. गणेश चंदनशिवे, रघुवीर खेडेकर, श्रीमती संगीता व कविता विठ्ठल उमप आदी मान्यवर पदाधिकारी, लोककलावंत, नागरिक उपस्थित होते.
