राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने सुप्रसिद्ध संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव असलेल्या नाट्यगृहातील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली व प्रकल्पाच्या गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनात नाट्यगृहाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील प्रेक्षक व कलाकारांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विकासकामे प्रभावीपणे पूर्ण होणे आवश्यक आहे.
सांस्कृतिक वारसा जपणे आणि पुढील पिढ्यांसाठी अधिक सक्षम बनवणे हीच खरी जबाबदारी असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी म्हटले.
