संपर्क युनिक फाउंडेशन च्या सामाजिक कार्याचे होत आहे सर्वत्र कौतुक—
👉खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या भावनेतून संपर्क युनिक फाउंडेशन ने एक परराज्यातील व्यक्ती ज्याला मानसिक समस्या होती, जो रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर सर्वांना त्रास देत होता. विचित्र हावभाव करून तो प्रवाशांना त्रास देत होता,पोलीसांनाही त्याच्यावर ताबा ठेवता आला नाही. त्यानंतर, पोलीसांनी रत्नागिरीत एक एनजीओ शोधली, ज्याचे नाव ‘संपर्क युनिक फाउंडेशन’ आहे, जी अशा लोकांचा ताबा घेऊन त्यांना मानसिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवते. मग पोलीसांनी संपर्क युनिक फाउंडेशनशी संपर्क साधला, त्यांचे अध्यक्ष, शकील गवाणकर आणि सल्लागार सचिन शिंदे यांच्याशी संपर्क केला.
शकील गवाणकर आणि सचिन शिंदे यांनी त्या मनोरुग्णाला अतिशय शिताफीने पकडले , आणि यांच्यासोबत त्या रुग्णाला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं ,सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर त्यांची रवानगी मनोरुग्णालय रत्नागिरी येथे करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि न्यायालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
