रत्नागिरीसती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात...

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
” नवशैक्षणिक वर्षारंभी चिमुकल्यांच्या पावलांनी गजबजली शाळा” – शाळा भरली जोशात…..

सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी या ISO 9001-2015 मानांकन प्राप्त प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीचा दिवस १५ जून या दिवशी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी खेर्डी येथील प्रसिध्द खालू बाजाच्या सुमधुर संगीताच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ग्रंथ पालखी, विविध घोषवाक्ये, घोषणा, लेझीम, ढोल आदीसह शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठया उत्साहात सहभागी झाले होते. शाळेच्या शिक्षकांनी आपल्या वाहनावरून नवीन विद्यार्थ्यांना आनंदाने शाळेत आणले. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व विद्यार्थ्याचीओवाळणी करून , कागदावर पहिले पाऊल उमटवून फुलांच्या वर्षावात वाद्याच्या तालात शाळेत प्रवेश देण्यात आला. सर्व शिक्षा अभियांनार्तगत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण चिंचघरी गावच्या सरपंच सौ .अनिता गुरव ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. अशोक निर्मळ सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, व पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सकपाळ सर यांनी केले . त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व विदयार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी शाळेची साफसफाई करून रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली. शिक्षकांनी वर्गावर्गात मनोरंजक गोष्टी सांगून मुलांचे मनोरंजन केले. तसेच मुलांना गोड खाऊ देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ व उपस्थित मान्यवरांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख , ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ,शितल पाटील, स्वरा भुरण, शिक्षकेतर, कर्मचारी विनोद उदेग, एकनाथ चाळके, विजया मौजे, प्रतिभा तांबिटकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...