सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न*

सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता.चिपळूण या प्राथमिक विद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्साहात नुकताच संपन्न झाला. यावर्षी “निरोगी वृद्धत्वासाठी योगा” ही संकल्पना समोर ठेवून योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. योगा ही आपल्या भारतीयांची ओळख आहे. आज योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. निरोगी जीवनासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणूनच सर्वच विद्यार्थ्यानी नियमीत योगा करावा, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरविंद सकपाळ यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सभागृहात अतिशय उत्तम व्यवस्थेत करण्यात आले. यावेळी मोठया स्क्रीनवर योगासनाची माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शिक्षिका मनिषा कांबळी, अपूर्वा शिंदे ,विनया नटे, अर्चना देशमुख , ज्योती चाळके, व रूपाली खरात यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी ओंकार, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, पवनमुक्तासन, भद्रासन, कपालभाती, प्राणायाम, त्रिकोणासन, ताडासन, शवासन अशी विविध आसने घेण्यात आली. यावेळी शिक्षिका विनया नटे यांनी योगदिना विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन शितल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके , रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, शिक्षकेतर कर्मचारी विजया मौजे, विनोद उदेग, एकनाथ चाळके, विजया मौजे, प्रतिभा तांबिटकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Breaking News

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; किनाऱ्यापासून १२ सागरी...

गुरुपौर्णिमेनिमित्त करबुडे येथे साईचरणी शिवसैनिकांची नतमस्तक वंदना

गुरुपौर्णिमेनिमित्त करबुडे येथे साईचरणी शिवसैनिकांची नतमस्तक वंदना भारतीय कामगार सेनेचे...