रत्नागिरीसती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात श्रावण महोत्सव अंतर्गत रानभाज्या प्रदर्शन व मंगळागौर कार्यक्रम...

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात श्रावण महोत्सव अंतर्गत रानभाज्या प्रदर्शन व मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात श्रावण महोत्सव अंतर्गत रानभाज्या प्रदर्शन व मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न
सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) हे विद्यालय उपक्रमशील विद्यालय म्हणून सर्वश्रुत आहे . विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही या विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते .श्रावण महिन्याचे औचित्य साधून या महिन्यात होणारी रानभाज्यांची उपलब्धता यावर आधारित श्रावण महोत्सव व मंगळागौर कार्यक्रम विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला .पालकांच्या रानभाज्या स्पर्धा व विद्यार्थी पालक यांचा मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व मंगळागौर पूजनाने करण्यात आली. यानंतर रानभाज्या प्रदर्शन स्टॉलचे उद्‌घाटन चिंचघरी गावच्या सरपंच सौ .अनिता चंद्रकांत गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.सौ. जलश्री चाळके,सौ.अर्चना सौ नंदित आग्रे, शालेय समितीचे सदस्य श्री. अशोक निर्मळ सर,इंग्लिश मिडीअमच्या मुख्याध्यापिका सौ.समिक्षा पिटले, आंबडस प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. महाडीक ,पालक सदस्य सौ .अनिता कदम, सौ .शुभांगी कदम , सौ .इंगावले, सौ . सोमदे , सौ .तेजस्वी भुरण , सौ महाडिक , शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सकपाळ सरांनी रानभाज्या व त्याचे महत्व व शाळेच्या माध्यमातून या कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगितला . यावेळी सर्वाधिक पुस्तके वाचणारे विद्यार्थी कु . समर्थ उमेश अवरादी व कु. श्लोक वैभव भोसले यांना वाचकवीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले. डॉ .सौ . जलश्री चाळके मॅडमनी आपल्या मनोगतातून रानभाज्यांचे महत्व व आजच्या काळातील संकरीत भाज्यांचे होणारे परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. निर्मळ सर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी तीन गटात महिला पालकांच्या रानभाजी व त्याचे पदार्थ या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धक पालकांनी रानभाजी व त्यापासून तयार होणारे अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ व रानभाज्यांची आकर्षक मांडणी केली होती . प्राथमिक गटात व शिशुविहार गट असे एकूण ४२स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परिक्षण सौ. अर्चना पोतदार व सौ. नंदिता आग्रे यांनी केले. स्पर्धेत शिशुविहार गटामध्ये प्रथम सौ.अंकिता सागर दळवी, द्वितीय सौ स्नेहा सुधीर जोशी, तृतीय सौ. शिवानी संकेत कांगणे तर प्राथमिक लहान गटामध्ये प्रथम सौ. प्रियांका अजय शिगवण, व्दितीय सौ. जान्हवी अविनाश बामणे, तृतीय सौ. देविका वासुदेव शिंदे तर प्राथमिक मोठ्या गटात प्रथम सौ सुष्मिता सुरेश बैकर , द्वितीय सौ . अवनी पंकज खेडेकर, तृतीय सौ उज्वला विनायक वरुडे यांनी प्राविण्य प्राप्त केले. विजेत्या स्पर्धकांना व सहभागी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. यावेळी महिला पालकांनी व विद्यार्थ्यांनी मंगळागौरीचे विविध आकर्षक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ अपूर्वा शिंदे मॅडम व दिक्षा परब मॅडम यांनी केले .
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत,अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, विजया मौजे शिशुविहारच्या मुख्याध्यापिका ममता ठसाळे, शिक्षिका अश्विनी कांबळे, तन्वी लटके,साक्षी जाधव, दीक्षा परब, नर्सरीच्या शैलजा पडयाळ, प्ले स्कूलच्या गौरी लाड तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग, एकनाथ चाळके,अनिता चाळके ,प्रतिभा तांबिटकर यांनी विशेष मेहनत घेतली

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...