रत्नागिरीसमाधान समारोह 2026, विशेष लोकअदालत 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत

समाधान समारोह 2026, विशेष लोकअदालत 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत

समाधान समारोह 2026
विशेष लोकअदालत 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत
रत्नागिरी, (जिमाका):- सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने समाधान समारोह 2026 अंतर्गत, 21,22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, विनोद वाय. जाधव तसेच जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम. अंबाळकर यांनी केले आहे. समाधान समारोह उपक्रमांतर्गत प्रकरणे संदर्भित करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांच्याकरीता आपली प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध करुन दिलेली आहे. याचा लाभ घेऊन तडजोडपात्र प्रकरणे या विशेष लोक अदालतमध्ये आपसी तडजोडीने सोडविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा.
विशेष लोक अदालतीबाबतच्या माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ८५९१९०३६०८ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२३५२-२२४७६८ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पक्षकारांना तसेच प्रकरणातील वकीलांना आभासी व्यासपीठाद्वारे या विशेष लोक अदालतीमध्ये उपस्थित राहता येईल. त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सांमजस्याने सोडवावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.
समाधान समारोह 2026 अंतर्गत 21,22,23 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित विशेष लोक अदालतमध्ये प्रलंबित प्रकरणांचा परस्पर संमतीने जलद निपटारा करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे देशभरातील वाद प्रकरणे मध्यस्थी व तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहभागी न्याय आणि न्याय आपल्या दारी या संकल्पांना बळ देण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम 21 एप्रिल पासून सुरु झाला असून ऑगस्ट महिन्यातील विशेष लोक अदालतीद्वारे त्याचा समारोप होणार आहे.

Breaking News

Sticky vs Cashable Free Spins Explained Clearly

Sticky vs Cashable Free Spins Explained ClearlySticky free spins...

Je online hazard v Finsku legální?

Je online hazard v Finsku legální?Krátká odpověď zní: ano,...