रत्नागिरीसह्याद्री कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व पालकांचा गौरव

सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व पालकांचा गौरव

सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व पालकांचा गौरव
आमदार शेखरजी निकम यांचेकडून विशेष कौतुक
सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी आमदार शेखरजी निकम कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम विश्वस्त शांताराम खानविलकर, संस्थेचे सचिव महेश जी महाडिक तरुणभारतचे उपसंपादक राजेंद्र शिंदे सावर्डे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्रचार्य विजय चव्हाण खेर्डी विद्यालयाचे प्राचार्य संजय वरेकर खेर्डी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ सावर्डे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शकील मोडक इंग्लिश मीडियम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिरा जोशी पालक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते तसेच सह्याद्रीच्या सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक शिक्षक या सभेला ऑनलाईन उपस्थित होते
यावेळी ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर यांनी कॉम्पिटिटिव्ह परीक्षा हा संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी बदल करणे आवश्यक असून, त्यातूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी या उपक्रमाच्या यशामागे संस्थेतील सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. पुढील काळात या उपक्रमाचा अधिक विस्तार करून विद्यार्थ्यांना विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखरजी निकम यांनी यशस्वी ४८ विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी पोहोचवून त्यांना यशस्वी करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संस्थेच्या शाळांबरोबरच इतर शाळांतील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षेतील सहभाग
इंग्रजी माध्यम : १८७ विद्यार्थी
मराठी माध्यम : ५१९ विद्यार्थी
एकूण : ७०६ विद्यार्थी
मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थी
तिसरी : मेहुल मंगेश कुलकर्णी (प्राथमिक शाळा सावर्डे)
चौथी : श्लोक सुरज शिंदे (प्राथमिक शाळा सावर्डे)
सहावी : अनुष्का अंकुश ढेंबरे (न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी)
सातवी : गार्गी घनश्याम घडशी (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय, सावर्डे)
इंग्रजी माध्यमातील गुणवंत विद्यार्थी
तिसरी : हर्षित उदयकुमार पाटील (इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे)
चौथी : सार्थक रुपेश कदम (धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी चिंचघरी)
सहावी : वीरा उमेश शिंदे (धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी चिंचघरी)
सातवी : ओम संतोष फुटक (इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे)
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची तयारी भक्कम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...