रत्नागिरीसह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे ठरली चॅम्पिअन्स ऑफ सह्याद्री

सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे ठरली चॅम्पिअन्स ऑफ सह्याद्री

सावर्डे :-सह्याद्री शिक्षण संस्थांतर्गत प्राथमिक शाळांच्या सह्याद्री क्रीडा संग्राममध्ये प्राथमिक शाळा सावर्डे ‘चॅम्पिअन्स ऑफ सह्याद्री’ ठरली.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात आज संपन्न झाल्या. यात मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेत आराध्या मंगेश भुवड हिने प्रथम तर मुलांच्या स्पर्धेत दीपेंद्र इंद्रबहादूर मौनी याने द्वितीय क्रमांक पटकावला.
मुलांच्या व मुलींच्या रिले स्पर्धेत शाळेचा संघ विजयी ठरला.
सह्याद्री स्पर्धा परीक्षेचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडीक, उदयराज कळंबे, अमर भाट, अरविंद सकपाळ, महेंद्र साळुंके, शकील मोडक, समीक्षा पिटले, स्वाती महाडीक, मीरा जोशी,मनाली पंडित यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले.
अनिल रेडेकर, रसिका सुर्वे, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, सेजल साळवी, प्रणित राजेशिर्के, मनीषा शिंदे, श्रुती कांबळे, योगिता मोहिते, अंकिता कुंभार, सतीश वारे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, पूजा निकम, प्रशांत निकम, शांताराम खानविलकर, मारुती घाग, मानसिंग महाडीक, आकांक्षा पवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

Breaking News