रत्नागिरीसावर्डे केंद्र क्र. 0623 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी सज्ज

सावर्डे केंद्र क्र. 0623 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी सज्ज

सावर्डे — महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोकण विभाग यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC) परीक्षेच्या आयोजनाची सर्व तयारी सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील केंद्र क्रमांक 0623 वर पूर्ण झाली आहे. सदर परीक्षा आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून शांततापूर्ण व भयमुक्त वातावरणात सुरू झाली आहे.
या केंद्रावर विज्ञान, कला, वाणिज्य, एम.सी.व्ही.सी. (HSC व्होकेशनल), तसेच आय.टी.आय. शाखेतील एकूण 806 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. त्यामध्ये विज्ञान शाखेचे डब्ल्यू 001573 ते डब्ल्यू 001954 असे 382 विद्यार्थी, कला शाखेचे डब्ल्यू 010557 ते डब्ल्यू 010696 असे 140 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे डब्ल्यू 016671 ते डब्ल्यू 016881 असे 210 विद्यार्थी, एम.सी.व्ही.सी. शाखेचे डब्ल्यू 023229 ते डब्ल्यू 023282 असे 54 विद्यार्थी आणि आय.टी.आय. शाखेचे डब्ल्यू 023823 ते डब्ल्यू 023842 असे 20 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
या केंद्रावर गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे; डॉ. तानाजीराव चोरगे ज्युनिअर कॉलेज, मांडकी-पालवण; न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वहाळ; वसंत शंकर देसाई ज्युनिअर कॉलेज, असुर्डे; तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावर्डे येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
केंद्र संचालक म्हणून प्राचार्य राजेंद्र वारे तर उपकेंद्र संचालक महणमंत घाडगे महेश गंगावणे काम पाहत आहेत. माध्यमनिहाय व विषयनिहाय विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलती राहणार असून परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांत घेण्यात येणार आहे. सर्व परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली पार पडणार असून विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त, गैरमार्गमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. कोणतीही अडचण असल्यास तात्काळ केंद्र संचालकांशी 9422392090 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले आहे.

Breaking News

जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी

रत्नागिरी,  :- जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे...