रत्नागिरीसावर्डे विद्यालयाचा तेजस राऊत ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराने’ सन्मानितआमदार शेखरजी निकम यांनी...

सावर्डे विद्यालयाचा तेजस राऊत ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराने’ सन्मानितआमदार शेखरजी निकम यांनी तेजसचे केले कौतुक

सावर्डे : चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने कोकणातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थी तेजस राऊत याला प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून एकूण २४३ विद्यार्थ्यांनी मुलाखतीत सहभाग नोंदवला होता. त्यामधून ३६ विविध विद्यालयांतील प्रत्येकी एक अशा एकूण ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन, कीर्तनकार व व्याख्याते डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले तसेच प्राध्यापक वैभव कानिटकर यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, १००० रुपये रोख व ५०० रुपयांची पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
तबला, ढोलकी वादन तसेच चित्रकला या कला जोपासणाऱ्या तेजसने विज्ञान शाखेची निवड करून तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसाय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याने तबल्याच्या प्रवेशिका व मध्यमा प्रथम परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेणारा तेजस नेहमीच आदर्श विद्यार्थ्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या सर्व गुणवैशिष्ट्यांचा विचार करून परीक्षकांनी त्याची या पुरस्कारासाठी निवड केली.सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग 25 वर्ष हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला असून, याबद्दल विद्यालयाचे विशेष अभिनंदन चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
तेजस राऊतला विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ. गौरी शितोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माझ्या या यशात माझ्या शाळेसह माझे आजी आजोबा व पालकांचे तेवढेच सहकार्य लाभले असे तेजस आवर्जून सांगतो
या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार श्री. शेखरजी निकम यांनी त्याचे विशेष कौतुक केले असून शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर सचिव श्री. महेश महाडिक, सर्व पदाधिकारी, संचालक, शालेय समितीचे चेअरमन श्री. शांताराम खानविलकर, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...