सावर्डे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेला सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्ती आणि एक विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झालेली आहे.
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला एका वर्षाला बारा हजार रुपये याप्रमाणे इयत्ता नववी ते बारावी अखेर चार वर्षे प्राप्त होते. श्रावणी राठोड विमुक्त जाती प्रवर्गातून जिल्ह्यात पहिली, सर्वेश तांदळे इतर मागासवर्ग 14 वा, श्रेया राडे इतर मागास 28 वी व सानिका घाणेकर खुला प्रवर्ग 66 वी याप्रमाणे गुणवत्ता यादीत स्थान पटकावून राष्ट्रीय शिष्यवृत्ती पटकावली आहे तर आर्या पवार या विद्यार्थिनीने महाराष्ट्र शासनाच्या दरवर्षी 9600रुपये प्राप्त होणाऱ्या सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झालेली आहे या विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षा विभाग प्रमुख मनोज कुलकर्णी,वर्षा चव्हाण, अपर्णा डिके,प्राजक्ता खेडेकर,दिशा विचारे, संचिता कदम,श्रेया राजेशिर्के,स्नेहा मेस्त्री व अविनाश पोतदर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम,ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी,संस्थेचे सचिव महेश महाडिक,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून सावर्डे परिसरातून ग्रामस्थांच्या कडूनही या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
