रत्नागिरीसावर्डे विद्यालयाच्या स्वच्छता उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

सावर्डे विद्यालयाच्या स्वच्छता उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

सावर्डे – विद्यार्थ्यांमधील स्वच्छतेची भावना दृढ व्हावी, स्वच्छतेचे जीवनातील महत्त्व याची जाणीव होऊन त्याचा प्रचार व प्रसार घरोघरी व्हावा, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत कौशल्यांचा विकास व्हावा व श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे या उद्देशाने गांधी तीर्थ स्वच्छता अभियान उपक्रमांतर्गत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे मधील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
होळीच्या सणानिमित्त श्रीदेव केदारनाथ यांची सावर्डे सहान परिसरात मोठी यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेत परिसरातील हजारो लोक सहभागी होतात त्याचबरोबर विविध दुकाने मोठ्या प्रमाणावर या यात्रेत थाटलेली असतात त्यामुळे प्लास्टिक रॅपर बॉटल्स कागद अशा प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर येथे पडतो. सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सहाण परिसरात स्वच्छता करून , कचऱ्याचे वर्गीकरण केले व कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. या उपक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबवलेल्या स्वच्छता उपक्रमाचे कौतुक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी केले आहे.

Breaking News

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा योग आला.

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा...

माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये दापोली विरसई ग्रामपंचायतीला कोकणात प्रथम क्रमांक

👉दापोली :- दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात...