रत्नागिरीसावर्डे विद्यालयात पालक–शिक्षक संवाद सभा संपन्न, नशा मुक्त अभियानांतर्गत उपस्थितांनी घेतली शपथव्यक्तिमत्व...

सावर्डे विद्यालयात पालक–शिक्षक संवाद सभा संपन्न, नशा मुक्त अभियानांतर्गत उपस्थितांनी घेतली शपथव्यक्तिमत्व विकासासाठी पालक-शिक्षक संवाद आवश्यक – प्राचार्य राजेंद्र वारे

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक–शिक्षक संवाद सभा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पालक आणि शिक्षक यांचा सातत्यपूर्ण संवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी या वेळी केले.

विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार संधी उपलब्ध करून देताना त्यांना सकारात्मक दृष्टीकोनाची जोड देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी जडणघडणीत पालकांची भुमिका महत्वाची असून गुणात्मक प्रगतीसोबतच संस्कारक्षम वातावरण देणे ही पालकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहावीच्या परीक्षेची तयारी प्रभावीपणे करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनचे मोबाईल ॲप डाउनलोड करून आवश्यक माहिती घेत विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण देण्याचे आवाहन करून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम याविषयी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले व नशा मुक्त भारत अभियानांतर्गत सर्वांनी शपथ घेऊन या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व जनजागृती करावी असे आवाहन केले.

या सभेला एकूण २५१ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, ज्यादा सराव परीक्षा, उत्तरपत्रिका लेखन शिबिर आदींचे महत्त्व याबाबत अशोक शितोळे यांनी सविस्तर माहिती दिली. शालांत प्रमाणपत्र परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षकांनी वर्गनिहाय पालक सभांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मुद्देसूद आढावा सादर केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल अचूक माहिती मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक सभेचा समारोप वर्षा चव्हाण यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

Breaking News

पवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

बारामती: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे...