रत्नागिरीसावर्डे विद्यालयात विद्यांजली पोर्टलचा आदर्श वापर : स्वयंसेवक अमृतकुमार कडगावे यांच्याकडून २०...

सावर्डे विद्यालयात विद्यांजली पोर्टलचा आदर्श वापर : स्वयंसेवक अमृतकुमार कडगावे यांच्याकडून २० लिटर रंग प्रदान

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने केंद्र सरकारच्या विशेष अभियान 5.0 अंतर्गत विद्यांजली पोर्टलचा प्रभावी वापर करून शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेचा उत्तम आदर्श निर्माण केला आहे. विद्यालयाला पेंटिंगसाठी आवश्यक असलेले रंगसाहित्य कमी पडत असल्याने विद्यांजली पोर्टलवर रंग व पेंटरची मागणी नोंदवण्यात आली होती.

ही मागणी स्वयंसेवक अमृतकुमार कडगावे यांनी पोर्टलवर पाहून तात्काळ स्वीकृत केली. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयाला २० लिटर रंग भेट म्हणून प्रदान केला. रंगसाहित्याचे हे योगदान मुख्याध्यापक राजेंद्र कुमार वारे यांच्या उपस्थितीत विद्यालयाकडे सुपूर्त करण्यात आले.

विद्यांजली पोर्टल हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे डिजिटल व्यासपीठ असून शाळांच्या गरजा आणि समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांना जोडून शैक्षणिक विकासासाठी सहकार्य उपलब्ध करून देते. या पोर्टलद्वारे शाळा आवश्यक वस्तू, साहित्य किंवा कौशल्याधारित सेवा मागवू शकतात व इच्छुक दाते त्या गरजा पूर्ण करण्यासाठी थेट सहभागी होतात.

अमृतकुमार कडगावे यांच्या मदतीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कुमार वारे उपप्राचार्य विजय चव्हाण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून त्यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

Breaking News