रत्नागिरीसावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना UPI, OTP व सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन

सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना UPI, OTP व सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन

सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना UPI, OTP व सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन
सावर्डे : डिजिटल व्यवहारांचे वाढते प्रमाण आणि सायबर गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी UPI, OTP व सायबर फ्रॉड जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सावर्डे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री. सुनील ताराबाई दिनकर भांगरे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट व ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, बनावट वेबसाइट्स आणि आकर्षक ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले. कोणतीही संशयास्पद लिंक उघडू नये, तसेच कोणालाही आपला OTP, UPI PIN, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉल किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ नये तसेच त्यांना परत फोनही करू नये, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय सोशल मीडियावर किंवा मोबाईलवर येणाऱ्या बनावट नोकरीच्या जाहिराती, लॉटरी, बक्षिसे, कर्ज मंजुरी, KYC अपडेट अशा प्रकारच्या संदेशांपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. अनोळखी व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ कॉल स्वीकारू नयेत किंवा अनोळखी क्रमांकावर व्हिडिओ कॉल करू नयेत, कारण अशा माध्यमातूनही आर्थिक व सामाजिक फसवणूक होऊ शकते, असे त्यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ पालक, शिक्षक किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, शिक्षकवृंद व इयत्ता दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...