रत्नागिरीसावर्डे विद्यालयात शिक्षणमहर्षी स्व. गोविंदरावजी निकम यांच्या कार्याचे स्मरण“स्व. गोविंदरावजी निकम यांनी...

सावर्डे विद्यालयात शिक्षणमहर्षी स्व. गोविंदरावजी निकम यांच्या कार्याचे स्मरण“स्व. गोविंदरावजी निकम यांनी माणसे घडवली” – प्राचार्य राजेंद्र वारे

सावर्डे – बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम असल्याची ठाम धारणा बाळगून शिक्षणाच्या माध्यमातून युवकांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी व माजी खासदार गोविंदरावजी निकम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे होते. यावेळी ते म्हणाले, “स्व. गोविंदरावजी निकम यांनी केवळ संस्था उभारल्या नाहीत, तर शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यनिष्ठ माणसे घडवली. त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःचे व समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवावे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य राजेंद्र वारे व उप प्राचार्य विजय चव्हाण यांच्या शुभहस्ते स्व. गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्व. निकम साहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे ‘स्मृतीगंध’ भित्तीपत्रक विद्यार्थिनी गौरी शितोळे व भानुदास तयार यांनी तयार केले असून, त्याचे अनावरण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थी मनोगतात साक्षी गोरे, श्रावणी राठोड व दिप्ती लिबे यांनी स्व. निकम साहेबांचे बालपण, संघर्ष आणि जीवनकार्य प्रभावीपणे मांडले. शिक्षक मनोगतात भानुदास चव्हाण यांनी सहकार क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्याचा समाजोद्धारासाठी झालेला सकारात्मक परिणाम उदाहरणांसह स्पष्ट केला.
या कार्यक्रमाचे निवेदन गौरी शितोळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन भानुदास चव्हाण व गौरी शितोळे यांनी केले. कार्यक्रमास मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी

*प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागरपरमपूज्य भालचंद्र महाराज...