रत्नागिरीसावर्डे विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत प्रभात फेरी व सायकल रॅली६०० विद्यार्थ्यांचा...

सावर्डे विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत प्रभात फेरी व सायकल रॅली६०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सावर्डे – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे प्रभात फेरी व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित टप्पा-दोनमधील या उपक्रमात विद्यालयातील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन मोहल्ला व आजूबाजूच्या परिसरातून प्रभात फेरी काढली. या वेळी “हर घर तिरंगा”, “भारत माता की जय” अशा देशभक्तिपूर्ण घोषणा देत वातावरण भारावून टाकले. त्याचबरोबर सायकल रॅलीद्वारेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधले.

या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे व उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी केले. आयोजनात शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे, प्रशांत सकपाळ व सुधीर कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...