रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपला ठिकठिकाणी गळती लागली आहे.
पाईप जीर्ण झाल्याने नळ पाणी योजनेच्या पाईप मधून दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या नळपाणी योजनेची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
हर्णे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपला ठिकठिकाणी गळती लागल्याने नागरिकांना मात्र पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे.तरी संबंधित पाणी पुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करावी असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे..