रत्नागिरीॲड. दीपक पटवर्धन यांना 'सहकार गौरव पुरस्कार' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान*-.

👉महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ या समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे अध्यक्ष मा.राहुलजी नार्वेकर, उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री मा.ना.उदयजी सामंत, सहकार राज्यमंत्री मा.ना.पंकजजी भोयर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार .रवींद्रजी चव्हाण व आमदार .प्रसाद लाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष मा. आमदार प्रवीणजी दरेकर यांनी केले होते.
सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली होती.
हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रातून केवळ चार पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सहकार महर्षी म्हणून विद्याधरजी अनासकर, सहकार रत्न म्हणून रेवतीताई पैठंणकर, सहकार भूषण म्हणून आ. विनयजी कोरे व सहकार गौरव म्हणून ॲड. दीपकजी पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. सहकारामध्ये उत्तम काम करणारे ॲड. दीपकजी पटवर्धन हे माझ्या मतदार संघातील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे वक्तव्य या कार्यक्रमात उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत यांनी आपल्या मनोगतात केले.
सहकारामध्ये उत्तम काम करणारे व्यक्तींचा हा गौरव असून त्यांच्या चांगल्या व उत्तम कामाला शासनाचा नेहमी सपोर्ट राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.
या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...