🙋♀️शिष्यवृत्ती परीक्षेत मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिमानास्पद यश–
🌹मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाब्रीया यांनी विद्यार्थी. पालक. प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा*
👉 महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी पावस मार्गावरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून ही आनंदाची बातमी आपणास सांगताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया प्राचार्य डॉ रोहीत देशपांडे यांनी व्यक्त केली आहे ..
👉 गेल्या काही वर्षां पासुन मुकुल माधव विद्यालयाचा दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के लागत आला आहे. आणि आता शिष्यवृत्ती परीक्षेत ही मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जबरदस्त भरारी घेतली असल्याने शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे..
👉 फिनोलेक्स चे चेअरमन प्रकाश छाब्रीया आणि मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाब्रीया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुकुंद माधव विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी भरारी घेतली आहे या ठिकाणी शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्यामुळे अल्पावधीतच मुकुल माधव विद्यालय एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध महाविद्यालय म्हणून पंचक्रोशीत उदयास झाले आहे. आज या विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळेच या शाळेचा दर्जा दिवसेंदिवस वाढत जात आहे…
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा – यशस्वी विद्यार्थी :
1️⃣ अहान माजगावकर
2️⃣ आर्या जाड्यार
3️⃣ अस्मी बने
4️⃣ मेघना सांते
5️⃣ राझी फोंडू
6️⃣ स्वरा जाड्यार
7️⃣ वरुणसिंह पुरोहित
8️⃣ झैनब बोरकर
✨ इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा – यशस्वी विद्यार्थी :
1️⃣ आस्था घाणेकर
2️⃣ भार्गवी शिंदे
3️⃣ स्नेहल दराडे
👉 विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि कठोर परिश्रम तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व विशेष मेहनत यामुळे हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी शिक्षकांनी शाळेच्या वेळेत नियमित शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना प्रभावी प्रशिक्षण दिले.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये पालकांचेही मोलाचे सहकार्य व सततचा पाठिंबा लाभला. त्याबद्दल प्राचार्यांनी सर्व पालकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
💐 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, समर्पित शिक्षकांचे आणि सहकार्य करणाऱ्या पालकांचे हार्दिक अभिनंदन! विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करत नवनवीन यश संपादन करावे, हीच कोकण 24 तास न्यूज चॅनल कडुन अपेक्षा व शुभेच्छा..
