रत्नागिरीअखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीतर्फे रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षपदी...

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीतर्फे रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षपदी श्रीमती गुलजार रमजान डोंगरकर यांच्या निवडीबद्दल भव्य सत्कार

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीतर्फे रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षपदी श्रीमती गुलजार रमजान डोंगरकर यांच्या निवडीबद्दल भव्य सत्कार; शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पदोन्नत केंद्रप्रमुख व अन्य मान्यवरांचाही गौरव.

रत्नागिरी –  अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित, रत्नागिरीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती गुलजार रमजान डोंगरकर यांचा भव्य सत्कार व शुभेच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून गुणवत्ता यादीत येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख ₹5,000, शाल, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गौरव करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. झोया तबरेज मिरकर (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, पडवे उर्दू, ता. गुहागर) हिने इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक व ग्रामीण जिल्हा गुणवत्ता यादीत नववा क्रमांक प्राप्त केला. कु. हूमेरा साकिब सोलकर (जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, कर्ला उर्दू मुलींची, ता. रत्नागिरी) हिने इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत 132 वा क्रमांक, तर कु. माहिरा सजाकत रोगनगर (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, पाचल उर्दू, ता. राजापूर) हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 158 वा क्रमांक प्राप्त करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
याच कार्यक्रमात उर्दू माध्यमातील केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांचाही शाल, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या केंद्रप्रमुखांमध्ये श्री मुनाफ गुहागरकर (कुरधुंडाउर्दू, ता. संगमेश्वर), श्री आसिफ शेख (कडवई उर्दू, ता. संगमेश्वर), श्रीमती नाझिया पटेल ( फुरुस उर्दू, ता. खेड), श्रीमती शबनम पीरखान (सौंदळ उर्दू, ता. राजापूर) आणि श्रीमती मॅक्सिमा पावस्कर (कातली उर्दू, ता. राजापूर) यांचा समावेश होता.
तसेच, सेवानिवृत्त शिक्षक श्री अखलाक सावंत सर यांचाही सत्कार करण्यात आला तसेच रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित, रत्नागिरीचे तज्ज्ञ संचालक श्री सतीश सावर्डेकर व श्री सचिन चांदिवडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही शाल, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री अखलाक परकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष श्री दिलीप देवळेकर, शिक्षक नेते श्री बळीराम मोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश काजवे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सचिव श्री संतोष पावणे तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री हिदायत कासिम नाईक, जिल्हा सचिव श्री मुनाफ नूरमोहम्मद गुहागरकर तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नाजिम कोतवडेकर यांनी केला उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशाच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केले

Breaking News