🔴 अखेर तो दिवस पुन्हा उजाडलाच-🔴
👉रत्नागिरी नगर परिषदेने अल निनोचे कारण पुढे करीत दर सोमवारी शहरातील पाणी पुरवठा बंद करण्याची अखेर केली घोषणा…
👉यंदा कमी प्रमाणात झालेला पाऊस तसेच वाढत असलेले तापमान ह्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता मोठया प्रमाणावर जाणवू शकते. त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्याच्या बचतीकरिता दिनांक 12/10/2026 पासून यापुढील दर सोमवारी पुढील मान्सूनच्या नियमित आगमनापर्यंत शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तसेच शासनाच्या निर्देशानुसार 10 % पाणी कपात करणेत येणार आहे.याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ आणि पानवल धरण्याच्या दुरुस्ती वर करोडो रुपये खर्च करण्यात आले. जेणेकरुन लिकेच बंद व्हावे आणि पाण्याचा मुबलक साठा शिल्लक असावा.आणी रत्नागिरी शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होवू शकेल. परंतु दुदैवाने मात्र अवस्था जैसे थे असल्याने अखेर अलनिनो चे कारण देत पुन्हा दर सोमवारी पाणी पुरवठा बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे..वाह.
