रत्नागिरीअखेर देवरुख एस.टी. आगाराला ही मिळाल्या नवीन बसेस !

अखेर देवरुख एस.टी. आगाराला ही मिळाल्या नवीन बसेस !

देवरुख :- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एस.टी. आगारातील एस.टी.बस टंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, आमदार शेखर निकम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आगाराला १० नवीन बसेस मिळाल्या आहेत. त्यातील पहिल्या ५ बसेस नुकत्याच दाखल झाल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात चिपळूणच्या माजी पंचायत समिती सभापती सौ. पुजाताई निकम, युवा नेते अनिरुद्ध निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, एस. टी. आगार कर्मचारी वृंद व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून देवरुख एस.टी.आगारातील बससेवा अपुरी होती. बस गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. जुन्या बसेस सतत बिघडणे, प्रवासात अडथळे येणे, पावसाळ्यात बसेस गळणे यामुळे नागरिक त्रस्त होते. आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवून नवीन बसेस मिळाव्यात यासाठी आग्रह धरला. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांची विशेष मदत लाभल्याने महायुती सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात मोठे यश मिळाले.
आमदार शेखर निकम अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकले नसले तरी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी प्रवाशांनी या बसेस स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याचे आवाहन केले.
या नव्या बसेस मिळाल्याने संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक केले आहे.

Breaking News