रत्नागिरीअग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयातर्फे बँकर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयातर्फे बँकर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

बँक ऑफ इंडियाला विजेतेपद ; ॲक्सिस बँक संघ उपविजेता तर फेडरल बँक संघ तृतीय
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय, रत्नागिरी (बँक ऑफ इंडिया) तर्फे आयोजित बँकर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2025-26 (पर्व तिसरे) नुकत्याच बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र रघुनाथ देवरे व उप आंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आज़ाद यांच्या मार्गदर्शनाखाली सोसा क्रिकेट मैदान, कोळंबे येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी बँक ऑफ इंडिया संघाने विजेतेपद पटकावले. ॲक्सिस बँक संघ उपविजेता, तर फेडरल बँक संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये बँक ऑफ इंडिया संघाचे कर्णधार संकेत सकपाळ यांना उत्कृष्ट फलंदाज, बँक ऑफ इंडिया संघाचे रोहित सुर्वे यांना उत्कृष्ट गोलंदाज, बँक ऑफ इंडिया संघाचे अजय प्रताप यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (मॅन ऑफ द टूर्नामेंट), तर ॲक्सिस बँक संघाचे संदीप उर्फ सँडी यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले.
या बँकर्स प्रीमियर लीग 2025- 26 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन दत्ताराम कानसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक शुभम सिन्हा व निशांत राज निशू, ॲक्सिस बँकेचे जिल्हा समन्वयक नितीन पावसकर, फेडरल बँकेचे जिल्हा समन्वयक योगेश सावंत, तसेच सोसा क्रिकेट अकॅडमीचे मालक केतन सावंत उपस्थित होते.
या स्पर्धेत बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयडीबीआय बँक व ॲक्सिस बँक अशा एकूण 13 बँकांच्या संघांनी सहभाग घेतला होता.

Breaking News

शिक्षणमहर्षि गोविंदरावजी निकम ‘सह्याद्री पुरस्कार–2026’ मा. श्री. संजीव करपे यांना जाहीर

सावर्डे : ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन व शाश्वत उपजीविकेच्या...

सुमन विद्यालय टेरवची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड….

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक...