रत्नागिरीअतिशय दुःखद बातमी-

अतिशय दुःखद बातमी-

अतिशय दुःखद बातमी–. कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ समाजसेवक, एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व, शिक्षण महर्षी, कुळ कायद्याचे अभ्यासक ,शामरावजी पेजे महाविद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष ,ओबीसी समाजाचे अभ्यासक, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि बळीराज सेनेचे सरचिटणीस नंदकुमार मोहिते यांचे आज सकाळी ह्रदय विकार झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच क्षणभर धक्काच लागला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचं नुकसान तर झालेलेच आहे परंतु कुणबी समाजाचे सुद्धा कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे.
उद्या ७ मार्च रोजी सकाळी अंत्यदर्शना साठी १०वाजता लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालय शिवार आंबेर येथे ठेवण्यात येणार आहे.आणि १०:३० ला अंत्यविधीसाठी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे कै.नंदकुमार मोहीते यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Breaking News

भरती परीक्षा पारदर्शक करा;

भरती परीक्षा पारदर्शक करा; स्थानिक भूमिपुत्रांना गुणवत्तेनुसार रोजगाराची संधी द्या! दि....

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन---- न्याय न...