Uncategorizedअली पब्लिक स्कूल सावर्डेमध्ये ओरोगामी कार्यशाळा संपन्न-

अली पब्लिक स्कूल सावर्डेमध्ये ओरोगामी कार्यशाळा संपन्न-

कला ही जीवनाची सावली आहे ती जपणे आवश्यक आहे -श्री उद्धव तोडकर
सावर्डे – फलाहे दारेन सोसायटी चिपळूण संचलित अली पब्लिक स्कूल सावर्डे येथे ओरोगामी कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळे साठी सावर्डे हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री उद्धव तोडकर हे उपस्थित होते कार्यशाळेच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षिका श्रीमती मदिया तांबे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले या प्रस्ताविकेतून त्यांनी श्री उद्धव तोडकर यांनी आपल्या 37 वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत कलेसाठी दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली याप्रसंगी लोकल कमिटीचे सदस्य श्री साजिद चिकटे यांनी श्री तोडकर यांचे स्वागत केले
प्रथम तोडकर यांनी ओरोगामी म्हणजे काय त्याचा जीवनात होणारा उपयोग कला ही जीवनाची कशी सावली आहे याची सविस्तर माहिती आपल्या ओगवत्या शैलीत दिली
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला व त्यातून विविध वस्तू टाकाऊ पासून टिकाऊ कशा बनवायच्या या त्याने श्री उद्धव तोडकर मार्गदर्शनाखाली शिकल्या
या कार्यशाळेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वसीमा चिकटे सफिना चौगुले झेबा आचरेकर मुसिफ जांभरकर अस्मिना बोंबल इत्यादी शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच...