चिपळूणअलोरे शिरगाव पोलीस ठाणे अंतर्गत मंदार एज्युकेशन सोसायटी येथे नवीन कायद्याचे ओळख...

अलोरे शिरगाव पोलीस ठाणे अंतर्गत मंदार एज्युकेशन सोसायटी येथे नवीन कायद्याचे ओळख व अंमलबजावणी याबाबत कार्यशाळा संपन्न–

शिरगाव… चिपळूण तालुक्यातील अलोरे शिरगाव पोलीस ठाणे अंतर्गत मंदार एज्युकेशन सोसायटी येथे नवीन कायद्याचे ओळख व अंमलबजावणी याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
सदर कार्यशाळेेकरिता सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती कदम यांनी नवीन कायद्याच्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्षा अधिनियम या नवीन कायद्याबद्दल माहिती देऊन कायद्यामध्ये झालेले बदल, नवीन तरतुदी तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 , विशाखा समिती, सायबर गुन्हे व कायदा , बालकांचे कायदे, महिलांबाबत असलेले कायदे व तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंदार एजुकेशन सोसायटी चेअरमन मंदार शिंदे, अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे स पो नी भरत पाटील ,पोलिस कर्मचारी शिक्षक वर्ग उपस्थित होते .सदर कार्यशाळेकरिता सर्व पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी नागरिक, महाविद्यालयाचे स्टाफ विद्यार्थी असे 100 ते 120 लोक उपस्थित होते.

Breaking News

सावर्डे विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उत्साहात प्रारंभ

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक...

अली पब्लिक स्कूल सावर्डे येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश

सावर्डे -राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिट चित्रकला...