रत्नागिरीअसुर्डे विद्यालयात ज्ञान प्रबोधिनी क्रीडा शिबिर

असुर्डे विद्यालयात ज्ञान प्रबोधिनी क्रीडा शिबिर

चिपळूण: ज्ञान प्रबोधिनी संस्था निगडी पुणे पुरस्कृत टाटा उद्योग समूहाच्या अर्थसहाय्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशी खेळ व खेळांचे पायाभूत ज्ञान शिबिर सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,असुर्डे आंबतखोल या विद्यालयात आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजक, मा. योगेश भागडे, कुशिवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी, सहकार महर्षी,माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांचे नातू तसेच चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.शेखरजी निकम यांचे चिरंजीव, सह्याद्रि क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष, चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व माननीय अनिरुद्ध निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अनिरुद्ध निकम यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपला सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की सह्याद्रि शिक्षण संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधांचा व प्रशिक्षणांचा सर्व विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा.ज्ञान,विज्ञान, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवून उत्तम करिअर घडवावे. ज्ञान प्रबोधिनी संस्था, निगडी यांच्यामार्फत विविध खेळांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण यांचा विविध स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये, खेळांमध्ये प्राविण्य दाखविण्यासाठी उपयोग करून घ्यावा. या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील देशी खेळ व खेळांचे पायाभूत ज्ञान प्राप्त करावे व शाळेचे पर्यायाने संस्थेचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले.यावेळी त्यांनी ज्ञान प्रबोधिनी संस्था,निगडी व टाटा उद्योग समूह यांचे शिबिरासाठी अर्थसाहयाबद्दल आभार मानले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या मार्गदर्शनानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरासाठी विशाल सुर्वे,समन्वयक चिपळूण तालुका ज्ञान प्रबोधिनी संस्था, क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षक क्रांती म्हसकर व नवमान पटेल,बांबाडे गुरुजी इ.मान्यवर उपस्थित होते.क्रीडाशिक्षक व्ही पी कांबळे यांनी या शिबिराचे नियोजन केले.अश्मी कोचीरकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर मिलिंद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...