सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,असुर्डे- आंबतखोल या विद्यालयात श्रमिक कृषी संवर्धन संस्था, आरवली यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेला अनिमिया मुक्त भारत हा उपक्रम संपन्न झाला. स्वयंपूर्णता फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ॲनिमिया मुक्त भारत या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायत स्तरावर हिमोग्लोबिन स्क्रीनिंग व उपाययोजना हा कार्यक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम चिपळूण तालुक्यामध्ये स्वयंपूर्णता फाउंडेशनच्या वतीने श्रमिक कृषी संवर्धन संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील स्त्री पुरुष व मुला-मुली मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. कुपोषण व अशक्तपणा जास्त प्रमाणात असल्याने संपूर्ण आरोग्यावर शारीरिक व मानसिक क्षमता यावर हिमोग्लोबिनचा परिणाम होत आहे. या अनुषंगाने हा उपक्रम असुर्डे विद्यालयात राबविण्यात आला.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्री विलासजी डीके,सदस्य श्री विकास डिके श्रद्धा पवार व सहाय्यक तुषार पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भानुदास देसाई व सुरभी मोहिरे यांनी सहकार्य केले.
