कोकणआंबा वाहतुक करणाऱ्या तरुण ट्रान्सपोर्ट उद्योजकांना आणि आंब्याची थेट विक्री मुंबई पुण्यात...

आंबा वाहतुक करणाऱ्या तरुण ट्रान्सपोर्ट उद्योजकांना आणि आंब्याची थेट विक्री मुंबई पुण्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचे सहकार्य मिळावेम्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय यादवराव यांनी गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम यांच्याकडे दिले निवेदन.

आंबा वाहतुक करणाऱ्या तरुण ट्रान्सपोर्ट उद्योजकांना आणि आंब्याची थेट विक्री मुंबई पुण्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचे सहकार्य मिळावे
म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय यादवराव यांनी गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम यांच्याकडे दिले निवेदन.

हापुस आंबा कोकणची मुख्य अर्थव्यवस्था आहे हे दोन महिने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते आणि त्यावर वर्षभराचा खर्च चालतो. आंबा बागायतदारांची पुढची तरुण पिढी दलालाना आंबे न देता स्वतः आंब्याचे मार्केटिंग करतात आणि थेट मुंबई पुण्यात ठाण्यात घरपोच हापूस आंब्याच्या पेट्यांची डिलिव्हरी करतात. यामुळे खऱ्या अर्थाने हापूस आंबा शेतकरी जो परिश्रम करतो त्याला भविष्यात चांगले दिवस येतील.

मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या बघितल्यानंतर मुंबई पुण्यातील वाहतूक पोलिसांकडून, महत्वाचे म्हणजे वाशीमध्ये नव्या मुंबईतील ट्राफिक पोलिसांकडून, आणि मुंबई कोकण हायवे वरील ट्राफिक पोलीस या सर्वांकडून या वाहतूकदारांना आणि शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. हापूस आंबा म्हणजे श्रीमंत उत्पादन असा विचार करून या आंबा वाहतुकीला आणि शेतकऱ्यांना याचा प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होतो.

हापुस आंबा शेतकऱ्यांना आणि वाहतुकीला मुंबई पुण्यात त्रास दिला जाऊ नये, ज्या पद्धतीने भाजीपाला शेतकऱ्यांना मदतीचे सरकारचे धोरण असते अशा स्वरूपाचे धोरण आंबा बागायतदारांसाठी पोलिसांचे असायला हवे, आणि शेतकरी या नात्याने पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळायला पाहिजे . काही चुका झाल्या तर मोठे दंड करून नाही तर ताकीद देऊन व शेतकऱ्यांना समज देऊन सोडले पाहिजे.
शहरांमधील वाहतुकीचे सगळेच नियम ग्रामीण भागातील ड्रायव्हरला किंवा शेतकऱ्यांना माहीत नसतात. आंबा वाहतुकीसाठी ट्रॅफिक पोलिसांचे विशेष सहकार्याचे धोरण असले पाहिजे ही मागणी यावेळी संजय यादवराव यांनी केली.

ही मागणी घेऊन सजंय यादवराव स्वतः राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांची भेट घेतली. अतिशय रचनात्मक पद्धतीने काम करणारे कार्यक्षम युवा मंत्री म्हणून योगेशजी कदम यांचा लौकिक आहे.

त्यांनी ही शेतकऱ्यांची समस्या समजून घेतली आणि यावर लगेचच उपाययोजना करण्याचे मान्य केले त्याप्रमाणे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करण्याचे त्यांनी मान्य केले. याकरता विशेष सहकार्याचे पोलिसांचे धोरण असले पाहिजे या मुद्द्याला सहकार्य करायचे त्यांनी मान्य केले. कोकणातील शेतकरी आणि आंबा बागायतदार यांची एक विशेष बैठक लवकरच आयोजित करण्याचे माननीय योगेश जी कदम यांनी ठरवले आहे. अशा स्वरूपाची विनंती आपण करत आहोत. आंबा वाहतुकी व्यतिरिक्त अनेक समस्या कोकणातल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आहेत, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी आवश्यक त्या ॲक्शन घ्याव्यात याकरता बैठकीची विनंती सुद्धा आपण शिवस्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे. कोकणातील आंबा वाहतुकीची प्रशासकीय अडचणी आणि पोलिसांच्या अडचणी, मुंबई पुण्यात शेतकरी थेट आंबे वितरित करताना त्यांना येणाऱ्या पोलिसांच्या अडचणी या माननीय योगेश कदम यांच्या प्रयत्नातून सुटतील असा विश्वास वाटतो. आज सकाळी फोन केल्यानंतर आजच वेळ देऊन त्यांनी हा प्रश्न समजून घेतला आणि त्यावर निश्चित कारवाई करायचे ठरवले यासाठी माननीय नामदार योगेश कदम यांचे मनापासून आभार.

संजय यादवराव
शिवस्वराज्य एक लोक चळवळ
शिवस्वराज्य अंबा बागायतदार संघटना.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...