रत्नागिरीआंबा हंगाम लांबणीवर असला तरी ओल्या काजूगाराचे बाजारात झाले आगमन.

आंबा हंगाम लांबणीवर असला तरी ओल्या काजूगाराचे बाजारात झाले आगमन.

मोठी मागणी, दर 1200 ते 1500 रूपये किलो. काजू लागवडीतून रोजगार उपलब्ध,

कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू लागवड मोठ्या प्रमाणात असून एक प्रमुख फळपीक म्हणून काजूकडे पाहिलं जाते. काजूचा हंगाम सुरू झाला आहे. रानात पिवळ्या लाल बोंडानी काजू बहरल्या आहेत.या काजू मधून शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत. बाजारामध्ये काजूचे ओलेगर विक्रीसाठी उपलब्ध असून यातूनच शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळत आहे.

कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. कोकणात विविध फळे याच निर्सगाच्या सानिध्यात उपलब्ध होतात. काजू, आंबा, फणस, नारळ, सुपारी यासाठी कोकण प्रसिद्ध आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काजू हंगाम असून काजू बी तयार झाल्याने पिवळी, लाल काजूची बोंडे झाडाला लागलेली दिसतात. त्याला बीया लागलेल्या दिसतात. यावर्षी काजूचे उत्पादन चांगले आहे. ओले काजूगर यांना विशेष मागणी असते.

कोकणात काजू व्यवसाय करणारे आता अनेक शेतकरी तयार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात काजू लागवड सुद्धा करण्यात आली आहे. यासाठी शासकीय योजनांचा लाभ शेतकरी यांनी घेत काजू लागवड केली आहे. काजूला पोषक वातावरण कोकणात असल्याने काजू उत्पादन चांगले होते. रोजगाराचे साधन म्हणून काजूकडे पहिले जाते.

काजू हा एक अत्यंत पौष्टिक सुकामेवा असून, त्यात प्रथिने, खनिजे (तांबे, मॅग्नेशियम, जस्त, लोह) भरपूर प्रमाणात असतात. हाडांच्या मजबुतीसाठी, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काजू फायदेशीर आहेत. महाराष्ट्रात काजू लागवड प्रामुख्याने होते आणि ते देशातील एक महत्त्वाचे पीक आहे.

भारत, व्हिएतनाम, टांझानिया यांसारख्या उष्णकटिबंधीय भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते. भारतात महाराष्ट्र, गोवा, कोकण किनारपट्टीवर याचे मोठे उत्पादन होते.
काजूचे फळ ‘काजू सफरचंद’ म्हणून ओळखले जाते, ज्याच्या टोकाला काजूची बी (बियाणे) लटकलेली असते. या बीच्या आतला भाग आपण खातो.
काजूचे आरोग्यासाठीही महत्वाचे फायदे आहेत.
काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्याने हाडे मजबूत होतात, तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहेत .
त्यानंतर काजू योग्य प्रमाणात सेवन केल्यास काजू खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकतात.

Breaking News