रत्नागिरीआकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त सुगम संगीत मैफिलीचे आयोजन

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त सुगम संगीत मैफिलीचे आयोजन

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त सुगम संगीत मैफिलीचे आयोजन
रत्नागिरी ( प्रतिनिधी ) आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे सुगम संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मैफिल बुधवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 यावेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर होणार असल्याची माहिती कार्यालय प्रमुख अधीर गढपाले आणि कार्यक्रम प्रमुख डॉ. सुनील गायकवाड यांनी दिली.

आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रभरातील सर्व आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध सांस्कृतिक, सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी आकाशवाणी केंद्रही मागे नाही. रत्नागिरी केंद्रातर्फे सुगम संगीत मैफिल आयोजित करण्यात आले आहे. या मैफिलीत गायिका वैदेही करंबेळकर आणि अभिजीत नांदगावकर हे गायक कलाकार सुमधूर सुगम गीते सादर करणार आहेत. त्यांना महेश दामले (हार्मोनियम), राजू किल्लेकर ( सिंथेसायझर), उदय गोखले ( व्हायोलीन ), प्रथमेश देवधर ( तबला ) हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. तर आकाशवाणीच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे आणि कश्मीरा सावंत निवेदनाची सूत्र सांभाळणार आहेत. याचबरोबर ध्वनीव्यवस्था उदयराज सावंत यांची आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री विवेक वानखडे हे पहात आहेत.

रसिकांसाठी या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...