आज चिपळूण येथे वनविभाग रत्नागिरी आणि सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप तसेच वनवणवा प्रतिबंधात्मक उपाय योजना या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले की,शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि निसर्ग संवर्धनाच्या कामात सहभागी होता यावे, याच उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वणवा ही निसर्गाची आपत्ती नसून,अनेकदा मानवनिर्मित चूक असते. वणवा लागल्यावर नुकसानभरपाई मागितली जाते, पण टाकलेली सिगरेट, पेटवलेले गवत यामुळेच निसर्गाची हानी होते.प्रत्येकाने आपल्या बागेतील गवत वेळेवर हटवले, जागरूकता ठेवली तर मोठ्या प्रमाणावर वणवे टाळता येऊ शकतात, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले. काही ठिकाणी जाणूनबुजून वणवे लावणारे गुन्हेगार सक्रिय आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशा सुचना ही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिल्या.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, उमेश सकपाळ यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.