मराठी भाषेच्या संवर्धन, विकास आणि प्रसारासाठी काम करताना आणखीन काय सुधारणा कराव्या लागतील किंवा कोणकोणते कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत याबाबत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी चर्चा केली.
महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि तिची प्रतिष्ठा वाढवणे यासाठी या संस्थेबरोबर आपण कायमच भक्कमपणे उभे आहोत व भविष्यात मराठी भाषेसाठी कराव्या लागणाऱ्या सर्वच कार्यासाठी आपण सोबत असल्याचे आश्वासन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिले.