रत्नागिरीआज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागगिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना....

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागगिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी चिपळूण येथील श्री. प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली व प्रकल्पाची पाहणी केली.

हा प्रकल्प केवळ स्थानिक नव्हे तर संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद आहे. अल्प कालावधीत येथे ६७ पेक्षा अधिक दुग्धजन्य उत्पादने तयार केली जात आहेत – ही खरोखर गौरवास्पद बाब आहे.

रत्नागिरीत मिल्क कलेक्शन कल्चर अद्याप रुजलेलं नाही, यावर सकारात्मक चर्चा झाली. हे कल्चर कोकणातही रुजावे, अशी आपली इच्छा आहे. पश्चिम महाराष्ट्राशी स्पर्धा करू शकणारा असा हा प्रकल्प आहे, असे यावेळी ना. डॉ उदय सामंत ह्यांनी म्हटले.

यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी शहरात वाशिष्ठी प्रॉडक्टचे एजन्सी सुरू करण्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रत्नागिरी एस.टी. स्टँड परिसरात देखील शाखा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले.

उद्योग, स्थानिक रोजगार आणि कोकणातील प्रगती यासाठी अशा प्रकल्पांचे मोठं योगदान असून, अशा प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा राहील, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आश्वस्त केले.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले,...