आठव्या वेतन आयोगाची समिती गठीत करणे, PFRDA कायदा रद्द करणे व इतर प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचाऱी
दिनांक. 23 सप्टेंबर 2025 रोजी धरणे – व निदर्शने आंदोलन करणार…
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा राज्य सरकारी – जिल्हा परिषद निमशासकीय -शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक – 9 जुलै 2025 रोजी प्रमुख मागण्यांसदर्भात धरणे आंदोलन करून असंतोष व्यक्त केलेला होता.
यानंतर आजमितीस दिड महिन्यांचा कालावधी उलटूनही केंद्र व राज्य सरकार प्रश्नांबाबत गंभीर नाही, ही बाब जनहित व विकास प्रक्रियेच्या विरूध्द आहे. अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाची दि. 16 व 17 ऑगस्ट 2025 राजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत याबाबत तीव्र असंतोष व्यक्त करून दि. 23 सप्टेंबर 2025 राजी संपूर्ण देश व राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा – रत्नागिरी या धरणे आंदोलनामध्ये सक्रीय सहभागी होत असून दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालयाबाहेर धरणे – निदर्शने आंदोलन केले जाणार आहे. सदर धरणे निदर्शने आंदोलनामध्ये सर्व जिल्हा परिषद कर्मचारी बंधू भगिनी सहभागी होणार आहेत. सदर धरणे – निदर्शने आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याबाबतची नोटीस श्रीमती. वैदेही रानडे, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आलेली आहे.
तरी जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत सर्व संवर्गातील सर्व नियमित व कंत्राटी कर्मचारी बंधू भगिनी यांनी बुधवार, दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या धरणे – निदर्शने आंदोलनामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. दिनेश सिनकर, सचिव श्री. प्रविण पिलणकर व कार्याध्यक्ष श्री. सुरेंद्र खाडे यांनी केले आहे.
आठव्या वेतन आयोगाची समिती गठीत करणे, PFRDA कायदा रद्द करणे व इतर प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचाऱीदिनांक. 23 सप्टेंबर 2025 रोजी धरणे – व निदर्शने आंदोलन करणार…
